झारखंडमध्ये नक्षलवादी आणि सैन्यात चकमक; तीन नक्षल्यांचा खात्मा, एक जवान शहीद


सामना ऑनलाईन । रांची

झारखंडाच्या गिरीडीहमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सोमवारी सकाळी चकमक उडाली. या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परंतु या चकमकीत एक सीआरपीएफचा जवान शहीद झाला आहे.

गिरीडीह हा भाग नक्षलग्रस्त आहे. इथे नेहमीच नक्षलवादी सरकारी कामकाजावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. सोमवारी चकमकीनंतर नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात विस्फोटक, एक एके 47 बंदुक, तीन मॅगेझिन आणि चार पाईप बॉम्ब सापडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 6.15 वाजता गिरीडीहमधील बेलभाग घाटात सीआरपीएफच्या सातव्या बटालियनने नक्षलवाद्यांविरोधात विशेष अभियान हाती घेतले होते. या कारवाईत चकमक उडाली आणि तीन नक्षलवादी ठार झाले. दुर्दैवाने या चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे.