तीन स्क्रीनवाला लॅपटॉप

50

सामना ऑनलाईन, लास वेगास

अमेरिकेतील लास वेगास इथे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक शो आयोजित करण्यात आलाय. यामध्ये तीन स्क्रीन असलेला एक लॅपटॉप सादर करण्यात आलाय. रेझर या कंपनीचा हा लॅपटॉर आहे, ही कंपनी गेमसाठी विशेष कॉम्प्युटर बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

या लॅपटॉपमध्ये मुख्य स्क्रीन व्यतिरिक्त दोन अतिरिक्त स्क्रीन देण्यात आलेल्या आहेत, ज्या सरकत्या आहेत. तीनही स्क्रीनचा साईज ही १७ इंचाची आहे. हा लॅपटॉप गेम खेळणाऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचा तज्ञांनी दावा केलाय.

‘प्रोजेक्ट वलरी’ असं या लॅपटॉपचं नाव ठेवण्यात आलं आलंय. रेझर कंपनीने दावा केलाय की हा अशा पद्धतीचा जगातला पहिला लॅपटॉप आहे. हा लॅपटॉप सरकत्या स्क्रीन बंद केल्या आणि फोल्ड केला तर त्याची जाडी ही फक्त १.५ इंच इतकीच होते. हा लॅपटॉप बाजारात उपलब्ध असलेल्या इतर गेमिंग लॅपटॉपपेक्षा कितीतरी सरस असल्याचं रेझर या कंपनीचं म्हणणं आहे. हा लॅपटॉप बाजारात केव्हा उतरवायचं आणि याची किंमत किती असावी याबाबत अजूण कोणताही निर्णय झालेला नाहीये.

 

आपली प्रतिक्रिया द्या