जम्मू कश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

2

सामना ऑनलाईन । श्रीनगर

दक्षिण कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. या तीनही दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. या चकमकीत दोन जवान जखमी झाले असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुलगाम जिल्ह्यातील लारो भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. त्यानंतर या भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी एका घरात काही दहशतवादी लपले असल्याचे जवानांना समजले. जवानांनी त्या घराला वेढा घातल्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. यावेळी झालेल्या चकमकीत घरातील तीनही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीदरम्यान कुलगाममधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

summary : Three terrorists have been killed in the encounter in kulgam