कश्मीर – अनंतनागमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान यश आले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील वाणी हमा गावामध्ये तीन दहशवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. ठार केलेल्या दहशतवाद्याकडून एके -४७, एसएलआर आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

सोमवारी रात्री ८ च्या सुमारास गस्तीवर असणाऱ्या जवानांना अनंतनाग जिल्ह्यातील वाणी हमा गावामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. जवानांनी परिसराला घेरा घालत केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या भागात आणखी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता असल्याने जवानांनी शोध मोहीम तीव्र केली आहे.