३ दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास अटक

सामना प्रतिनिधी । जालना

जालना शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोटार सायकल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई ५ डिसेंबर रोजी करण्यात आली. सुंदर सखुसिंग राजपुत (रा. लोधीमोहल्ला, जालना) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

गुप्त खबऱ्याच्या माहितीवरून स्थागुशाचे उपनिरीक्षक जयसिंग परदेशी व त्यांच्या पथकाने लोधी मोहल्ल्यात सुंदर राजपुत यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने होडा शाईन मोटार सायकल व अन्य २ दुचाकी चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या केलेल्या होन्डा शाईन मोटार सायकल, हिरो कंपनीची फॅशन प्लस मोटार सायकल, बजाज कंपनीची केलीवर मोटार सायकल अशा ३ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या. दरम्यान, आणखी दुचाकी चोरीचे तपास सुंदर राजपुत याच्याकडून लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.