भिंतीपल्याड लपलेल्या दहशतवाद्यांची खैर नाही

7


सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरमध्ये लपूनछपून जवानांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लष्कर वॉल रडार या यंत्रणेचा वापर करणार आहे. यामुळे भिंतीपलिकडे किंवा तळघरात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधणे सोपे होणार आहे. अमेरिका व इस्त्रायलमधून हे रडार मागवण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-कश्मीरमध्ये घुसखोरी बरोबरच जवानांवर दगडफेक होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात स्थानिकांचाही सहभाग असल्याने दहशतवाद्यांना शोधून काढणे हे लष्करासाठी मोठे आव्हान आहे. हे दहशतवादी लपण्यासाठी एखाद्या घरात, शाळेच्या इमारतीत आश्रय घेतात. यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना जवानांना नागरिकांचाही सामना करावा लागतो. यातून जवानांवर दगडफेक होण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे वॉल रडार ही यंत्रणा जवानांचे काम सोपे करणार आहे.

या रडारमधील मायक्रोवेव्ह रेडिएशन भिंतीचेच स्कॅनिंग करणार आहे. यामुळे भिंतीपलिकडच्या हालचाली टिपता येणार आहेत. तसेच हे रेडिएशन मानवी शरीरातून निघणाऱ्या इलेक्ट्रॉमॅग्नेटिक लहरींचाही वेध घेत असल्याने दहशतवादी नक्की कुठे लपलेत हे रडारवर दिसणार आहे. तसेच सध्या लष्कर DRDO चा इलेक्ट्रॉनिक्स अँड रडार डेव्हलपमेंट इस्टॅबलिस्मेंट (LRDE) या तंत्रज्ञानावर काम करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या