डोळ्यात मिरचीची पूड टाकून रोकड सह अॅक्टिवा पळविली

1

सामना प्रतिनिधी । कोपरगांव

मुंबई नागपूर हायवेवर शिवसाई पेट्रोल पंपाजवळ अज्ञात चार चोरटे मोटर सायकलवर आले व स्कुटीवरुन जाणार्‍या इसमाच्या डोळयात मिरचीची पूड फेकून त्यास जायबंदी केले व त्याचेकडील रोख रक्कम रु 78 हजार 240 रोख व अ‍ॅक्टिव्हा गाडी असे एकूण रु एक लाख आठ हजाराचा ऐवज घेवून पोबारा केला.

या प्रकरणी कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चार चोरटयांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. अनिल भाऊसाहेब बर्डे रा. श्रीरामपूर शिर्डी हा शिवसार्इ पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून कामास आहे. दि. 22/ 4/ 2019 रोजी रात्री 9 च्या सुमारास शिवसाई पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल विक्रीचे मिळून 78 हजार 240 जमा झाले होते. रात्री 9.30 वा. सुमारास त्याने पेट्रोल पंपाची जमा झालेली रक्कम घेवून ते बॅगमध्ये भरले व शिर्डीकडे जाण्यासाठी अ‍ॅक्टिव्हा क्र. एमएच 17 बीडब्ल्यु 4881 वरुन निघाले. पेट्रोल पंपापासून सुमारे अर्धा कि.मि. अंतरावर हायवे रोडने पुणतांबा चौफुलीकडे जात असतांना रोडच्या कडेला एक मोटर सायकल त्यांचा पाठलाग करत होती. सदर मोटर सायकलवरील इसमांनी त्यांना ओव्हरटेक करुन त्यांच्या तोंडावर मिरची पावडर फेकली. त्यांनी लगेच गाडी थांबवली. ते डोळे चोळत असतांना मागुन पल्सर मोटर सायकलवरील इसमांनी स्कुटीवरील पैशांची बॅग काढण्याचा प्रयत्न करु लागला. डोळयांची आग होत असल्याने व ते दरोडेखोर असल्याचे लक्षात आल्याने ते पेट्रोल पंपाकडे जीवाच्या भितीने पळत सुटले. ते पळाल्यानंतर त्यांनी स्कुटीसह रक्कम घेवून पळून गेले. बर्डे यांनी कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चार चोरटयांविरुद्ध फिर्याद दिली आहे.