नोट खराब असल्याचे सांगत १३ हजार ५०० रुपये ढापले


सामना ऑनलाईन, रत्नागिरी

बॅंकेतून काढलेले पैसे मोजत असताना एक अज्ञात इसम जवळ आला त्याने एक नोट खराब आहे असे सांगत पैसे मोजणाऱ्या व्यक्तीचे लक्ष विचलित केले आणि त्यासंधीचा फायदा घेत १३ हजार ५०० रुपये घेऊन पोबारा केला. स्टेट बॅंक आॅफ इंडीया च्या खारेघाट शाखेत सईदा सादिक फणसोपकर (वय ५४ रा.र कर्ला )यांनी ४० हजार रुपये त्यांच्या बॅंक खात्यातून काढले त्यानंतर ते पैसे मोजण्यासाठी कॅश काऊंटरच्या बाजूला गेल्या.त्याठिकाणी पैसे मोजत असताना एक अज्ञात इसम जवळ आला त्याने सादिका फणसोपकर यांना एक नोट खराब असल्याचे सांगत लक्ष विचलित करत त्याने ४० हजार पैकी १३ हजार पाचशे रुपये घेऊन पोबारा केला.या चोरीची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.