उत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’

2

सामना प्रतिनिधी । मुंबई 

सोनी मराठीवरील ‘ती फुलराणी’ च्या माध्यमातून आपण गरीब कुटुंबातील मुलीची शिक्षणासाठीची आवड, ते मिळवण्यासाठीची तिची जिद्द आणि याच जिद्दीपायी आपल्या परिस्थितीवर मात करत घेतलेलं शिक्षण अनुभवत आहोत…. ही कथा आहे ‘ती फुलराणी’तल्या मंजूची. आपल्या शिक्षणाचा खर्च सुटावा म्हणून देशमुखांच्या घरात घरकाम करणार्‍या मंजूला ‘नोकरांनी शिक्षणाचं स्वप्न पाहू नये!’, असा सल्ला या देशमुखांनी दिला होता, मात्र आपल्या शिक्षणाप्रति असलेली चिकाटी कायम ठेवत श्रीमंतीचा माज असणार्‍या देशमुखांना चांगलाच धडा शिकवण्याच्या उद्देशाने मंजूने शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती केली आहे.

शिक्षणासाठी धडपडणार्‍या मंजूवर शौनकचा जीव जडला. त्याच्याही नकळत तो तिच्यात गुंतत गेला आणि या दोन भिन्न प्रवृत्तींमधील दरी वाढत्या शिक्षणाने भरून काढली. एकमेकांच्या प्रेमात असणार्‍या या दोघांच्या नात्याला देशमुख परिवार स्वीकारणार की नाही? जाणून घेण्यासाठी पाहत रहा ‘ती फुलराणी’ फक्त सोनी मराठीवर…