चंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू; अपघात की शिकार?

chandrapur-tiger-cub

सामना ऑनलाईन । चंद्रपूर

चंद्रपूरच्या जुनोना जंगल परिसरात आज पहाटेच्या सुमारास वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दोन बछड्यांना ट्रेनची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. मात्र या घटनेवर प्राणीप्रेमी संघटनांनी संशय व्यक्त केला असून हा अपघात की शिकार? असा संशय व्यक्त केला आहे.

यवतमाळच्या ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून मारण्यात आल्यानंतर आता वन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या आणखी काही घटना समोर आल्या आहेत. आज पहाटे चंद्रपूरच्या जुनोना जंगल परिसरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर बल्लारपूर-गोंदिया पॅसेंजरची धडक बसल्याने दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र प्राणीप्रेमी यांनी या घटनेवर संशय व्यक्त केला आहे.