टिकटॉकवरील दुश्मनीतून दिल्लीत एकाची हत्या

11

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रतिस्पर्ध्यांवर टीका करणारा एक व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केल्याने दिल्लीतीला टिकटॉक सेलिब्रिटीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मोहित मोर असे त्या सेलिब्रिटीचे नाव असून त्याचे टिकटॉकवर पाच लाख फॉलोअर्स आहेत. मोहितची हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

मोहीत हा मूळचा हरयाणातील बहादुरगढ येथील असून तो दिल्लीत जीम ट्रेनर म्हणून काम करायचा. अवघ्या कमी कालावधीत तो टिकटॉकवर प्रसिद्ध झाला होता. मोहित मंगळवारी त्याच्या एका मित्राच्या स्टुडिओत जात असताना बाईकवरून आलेल्या तीन जणांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या छातीत आठ गोळ्या लागल्या व त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस सध्या मोहितचे टीकटॉक, इंस्टाग्राम अकाऊंट तपासत असून त्यातून या हत्येचे धागेदोरे ते शोधत आहेत.

मोहित टिकटॉकवर अनेक सामाजिक मुद्द्यांवरील व्हिडीओ अपलोड करायचा. त्यावरून काही समाजकंटकांशी त्याचा वादही झाला होता असे समजते. त्यानंतर मोहितने त्यांच्यावर टीका करणारा एक व्हिडीओ टिकटॉकवर टाकला होता. त्या व्हिडीओवरूनच मोहीची हत्या झाल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या