टीप्स – बासरी घरात ठेवा


अनेकदा मोठमोठी धार्मिक कार्ये करूनही जे यश लाभत नाही ते घरात एखादी विशिष्ट वस्तू ठेवल्यामुळे लाभते. याच वस्तूंमध्ये बासरीचाही समावेश आहे. श्रीकृष्णाला प्रिय असणारी ही बासरी घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यश मिळवण्यासाठी बासरी घरी ठेवून पाहायला काही हरकत नाही.

> चांदीची बासरी आपल्या घरात असेल तर पैशाची चणचण भासत नाही असं म्हटलं जातं.

> घरात ठेवलेली बासरी सोन्याची असेल तर घरात लक्ष्मी नांदते. घरात ती कायमचा वास करते.

> बांबूच्या झाडापासून बनवलेली बासरी तत्काळ आपला चांगला प्रभाव दाखवते. ज्या लोकांना आयुष्यात यश प्राप्त होत नाही त्यांनी झोपण्याच्या खोलीच्या दरवाजावर दोन बासऱ्या लावाव्यात.

> घरात वास्तुदोष असेल, दोन दरवाजे एका सरळ रेषेत असतील तर घरातील मुख्य दरवाजाकर दोन बासऱ्या लावणं हितावह असतं.

> घरात सतत कुणीतरी आजारी पडत असेल तर, त्या व्यक्तीच्या खोलीबाहेर किंवा खोलीत बासरी लावून ठेवली तर चांगला परिणाम दिसेल.

> बासरीमध्ये तुमचे जीवन बदलून टाकण्याची ताकद असते. याचे अनेक प्रकार आहेत, परंतु बांबूच्या आणि चांदीच्या बासरीचा प्रभाक विशेष परिणामकारक असतो.