दम्यावर घरगुती उपचार

सामना ऑनलाईन । मुंबई

हिवाळा सुरू झाला की, दमा असलेल्या रूग्णांना जास्त त्रास होऊ लागतो. मग अशावेळेस काय करावे हे बऱ्याच जणांना सुचत नाही. हिवाळ्याच्या दिवसात दम्याच्या रूग्णांनी काही घरगुती उपचार केले तर नक्कीच त्यांना आराम मिळेल.

१. दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी थंड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावेत.

२. दही, दूध, ताक, मिठाई हे पदार्थ सहसा दम्याच्या त्रासाला आमंत्रण देतात, त्यामुळे या पदार्थांचे सेवन टाळा.

३. थंडीत छातीत कफ साचल्याने दम्याचा त्रास वाढतो. अशावेळी रूग्णांनी कोमट पाणी प्यावे.

४. सुंठ व मध किंवा आल्याचा रस व मध एकत्र करून प्यायल्याने थंडीत दम्याच्या रूग्णांना आराम मिळतो.

५. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी आंघोळ करण्यापूर्वी छातीला तीळाचे तेल लावून शेक घ्या. यामुळे छातीतील कफ नाहीसा होतो.

६. दोन ते तीन कप पाणी घेऊन त्यात तुळस व अडुळशाची दोन पाने घाला. त्याला उकळी देऊन त्याचा काढा बनवा. हा काढा रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी घेतल्यास दमा कमी होतो.

७. प्राणायाम किंवा कपालभाती यासारखे श्वसनसंस्थेशी संबंधित व्यायम करा.

८. कोबी गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घ्या.

९. आहारात लसूण, पडवळ, दुधी भोपळा, चवळी इ. भाज्यांचा समावेश करावा.

१०. सकाळी व संध्याकाळी दमा रुग्णाने मोकळ्या हवेत फिरावे.