सुंदर, तरुण दिसण्यासाठी हे नक्की करा

सामना ऑनलाईन । मुंबई

त्वचा चमकदार होण्यासाठी

२ चमचे दही आणि २ चमचे लिंबाचा रस एकत्र करून केलेला मास्क चेहऱयाला लावल्याने काळपटपणा दूर होऊन त्वचा तजेलदार, चमकदार होते.

मुलायम त्वचेसाठी

मुलायम त्वचा सर्वांनाच हवीहवीशी वाटते. त्यासाठी एक चमचा ओट पीठ, पाऊण चमचा चंदनाचे चूर्ण दुधात एकजीव करून चेहऱयाला लावावे. पंधरा मिनिटांनी चेहरा धुवावा. यामुळे त्वचा मुलायम, स्निग्ध राहते. तेलकट त्वचेसाठी हा उपाय गुणकारी आहे.

चिरतरुण त्वचेसाठी

१ चमचा अंडय़ातला पांढरा भाग आणि २ चमचे कोरफडीचा गर एकत्र करून तयार केलेला मास्क चेहऱयाला लावावा. काही वेळाने चेहरा स्वच्छ धुवावा.

नितळ चेहऱयासाठी

२ चमचे कॉफी पावडर आणि २ चमचे मध एकत्र करावेत. हा मास्क चेहऱयाला लावावा.

प्रसन्न, टवटवीत दिसण्यासाठी

एका टोमॅटोच्या रसात २ चमचे दूध घालून तयार केलेला मास्क वापरल्याने त्वचा प्रसन्न, टवटवीत राहते.

चेहरा स्वच्छ करण्यासाठी

१ चमचा लिंबाचा रसात २ चमचे मध मिसळून मास्क तयार करावा. हा मास्क चेहऱयाला लावल्याने त्वचा स्वच्छ होते.