टीप्स : काळ्या दाढीसाठी…

> खोबरेल तेलात लिंबाचे थेंब घाला. या तेलाच्या मिश्रणाने डोक्याला मालिश करा. यामुळे केस काळे होऊन त्यांना चमक येईल.

> आवळ्याचे छोटे-छोटे तुकडे करून ते  सावलीत वाळवा. नंतर   खोबरेल तेलामध्ये हे सुकवलेले आवळे तळा. हे तेल वापरा.

> महिनाभर दिवसातून एकदा ग्लासभर आवळ्याचा रस प्यायल्यानेही केसांचा रंग टिकून राहण्यास मदत होते.

> आल्याची पेस्ट बनवा. त्यामध्ये 1 चमचा मध मिक्स करा. हे मिश्रण दररोज लावल्यामुळे केस काळे होतात.

> काही पेरूच्या पानांची वाटून पेस्ट करा. या पेस्टने मालिश करा.

> आठवडय़ातून 2 वेळा शुद्ध देशी तुपाने केसांच्या मुळांशी मालिश केल्याने केस काळे आणि घनदाट होतात.

> केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रासलेले असाल तर कांद्याचा रस केसांना लावणे सुरू करा.