भाजल्यावर काय कराल?

22

भाजल्यावर काय कराल?

  • कोणत्याही कारणामुळे शरीराचा एखादा अवयव भाजल्यास त्या जागी थंड पाणी टाका. यामुळे फोड येणार नाहीत. त्यानंतर थंड पाण्यात कापड भिजवून ते भाजलेल्या अवयवावर लपेटा. जखम चिघळणार नाही.
  • भाजलेली जागा पाणी किंवा दुधाने धुवावी. मग त्या जागी कोरफडीचा गर लावावा.
  • जळलेल्या जागी बटाट्याचे काप किंवा साल लावा. जळजळ जाऊन थंड वाटेल.
  • भाजलेल्या जागी हळदीचे पाणी लावल्यास दुखणे कमी होते. प्राथमिक उपचार म्हणून हा उपाय करू शकता.
  • मधामुळे जखमेवरील जिवाणू नष्ट होतात. यासाठी एका कापसाच्या पट्टीवर मध घेऊन ती भाजलेल्या जखमेवर ठेवा. दिवसातून दोन ते तीन वेळा बदला.
  • थंड पाण्यात काही वेळ ठेवलेली टी-बॅग भाजलेल्या जागी ठेवा. टी-बॅगमध्ये टैनिक आम्ल असते. ज्यामुळे जखम भरून काढण्यास मदत होते.
  • तुळशीच्या पानांचा रस जळलेल्या जागी लावा. यामुळे डाग पडत नाहीत.
  • तिळाच्या तेलामुळेही आराम मिळतो. भाजलेल्या जागी तीळ वाटून लावा. जळजळ आणि दुखणे कमी होईल. शिवाय डागही नष्ट होतील.
  • चटका लागलेल्या जागी मीठ चोळा. यामुळे फोड येणार नाहीत. थंडही वाटेल.
  • जळलेल्या जागी खायचा सोडा टाकून मसाज करा. यामुळे जळजळ होणार नाही. आणि फोडही निघून जातील.