मधुमेहासाठी घरगुती उपाय

6

 मधुमेह झालेल्या व्यक्तीने पथ्य पाळणे, योगा करणे, दररोज सकाळी फिरायला जाणे व शुद्ध हवा घेणे हे उपाय अवश्य करावेत. गवतार उघड्या पायाने चालणेही मधुमेहींना आवश्यक आहे.

  • दोन ग्रॅम दालचिनी चूर्ण आणि एक लवंग पाण्यात उकळून घ्या. 15 मिनिटांनंतर हे पाणी सेवन करा. प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी सेवन केले तरी चालते.
  • बेलाच्या आणि सीताफळाच्या पानांचे चूर्ण तयार करून प्रत्येक दिवशी मधुमेह असलेल्या व्यक्तीने घेतले तर मधुमेह नियंत्रणात राहतो.
  • मधुमेहाचा त्रास असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लासमध्ये एक चमचा मेथीचे दाणे भिजवत ठेवा आणि सकाळी ते पाणी गाळून प्या. यामुळे मधुमेहाचा त्रास कमी होतोच, शिवाय पोट साफ राहून पोटदुखी, पोटातील जळजळ आणि अपचन यावर आराम पडेल.
  • मधुमेह फारच वाढला असेल तर फणसाच्या पानांचा रस दररोज सेवन करा. लिंबाच्या कोवळ्या पानांचा रस प्यायल्यावरही मधुमेह नियंत्रणात राहातो.
  • फरसबी आणि कोबीच्या पानांच्या रसाचे मिश्रण प्यायले तरी मधुमेह नियंत्रणात राहतो. भेंड्याची भाजी खाल्ल्याने किंवा भेंडी रात्री भिजत ठेवून सकाळी ते पाणी गाळून प्यायल्यानेही मधुमेह नियंत्रणात राहतो.