आजीच्या सुंदर चेहऱ्यासाठी

13


आजीच्या सुंदर चेहऱ्यासाठी

  • मसूर तुपासह घोटून तयार केलेला लेप दुधात मिसळून चेहऱ्यावर लावावा. असे सात दिवस केल्यास चेहरा सुंदर होतो.
  • रक्तचंदन, मंजिष्ठा, लोध्र, कोष्ठकोंिळजन, प्रियंगु, वडाचे अंकुर,मसूर यांचा लेप केल्यास वांग नष्ट होते व चेहरा सतेज होतो.
  • प्रियंगु, केशर, बोराच्या बीमधील मज्जा, सुगंधी वाळा, रक्तचंदन यांचे चूर्ण पाणी किंवा दुधात मिसळून तयार झालेला लेप चेहऱ्यावर लावण्याने चेहरा उजळ होतो.
  • नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे.
  • दिवसभरात जास्तीत जास्त वेळा चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यामुळे तेलकटपणा कमी होतो आणि त्वचेवर बसलेली धूळ निघून जाते.
  • त्वचा निरोगी दिसण्यासाठी रोज सकाळी तुळशीचा रस व मध यांचे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे रक्तशुद्धी तर होतेच, शिवाय त्वचा तजेलदार व्हायलाही मदत होते.
  • रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे आहे. दिवसभराची धूळ त्यामुळे निघून जायला मदत होते.
  • रात्री चेहरा धुताना ग्लिसरिन, लिंबाचा रस, गुलाबजल समप्रमाणात घेऊन हे मिश्रण चेहर्याला लावल्याने चेहरा स्वच्छ आणि टवटवीत होतो.
  • अल्प प्रमाणात आठवडाभर द्राक्षाचा रस घेतला, तर निस्तेज त्वचा उजळ होते. तसेच द्राक्षाचा रस सर्वांगाला लावल्यानेही त्वचा उजळायला मदत होते.
  • त्वचेचा पोत टिकवून ठेवण्यासाठी 3-4 थेंब ंिलबूरस, चिमूटभर शुद्ध हळद, 1 चमचा काकडीचा रस एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे.
  • काकडीचा रस, संत्र्याचा रस, पपईचा गर, सीताफळाचा गर यापैकी जो उपलब्ध असेल तो चेहऱ्याला लावता येऊ शकतो. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होतो.
आपली प्रतिक्रिया द्या