नितळ त्वचेसाठी सोपे घरगुती उपाय

नितळ त्वचेकरिता पार्लरमध्येच जायला हवं किंवा महागडय़ा क्रिम्स वापरायला हव्यात असे नाही, तर स्वयंपाकघरात नियमित वापरातील वस्तूंनीही चेहरा चमकदार होऊ शकतो.

> नारळपाणी चेहऱ्यावरील डागांसाठी रामबाण उपाय आहे. सकाळी  उठल्यानंतर चेहऱ्याला नारळपाणी लावा. काही वेळाने साध्या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा कोमल आणि साफ होईल.

> जिऱ्याशिवाय फोडणी होऊच शकत नाही. खाण्याबरोबरच जिऱ्याचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठीही होतो. जिरे दुधात वाटून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा कोमल होईल आणि त्वचाही उजळेल.

> दह्यामध्ये लिंबू मिसळून लावल्याने त्वचा गोरी होते तसेच चेहरा दुधाने धुतल्यास रंग उजळतो.

> लिंबामध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावा. काही दिवसांतच तुमची त्वचा उजळेल.

> गुलाबजलमध्ये लिंबाचा रस टाकून चेहऱ्याला लावाला, त्वजा नितळ होईल.