चमकदार चेहऱ्यासाठी महत्वाच्या टीप्स

सामना ऑनलाईन, मुंबई

चेहरा धुण्याकरिता बाजारातील विविध प्रकारच्या महागडय़ा फेस वॉशचा वापर केला जातो…हल्ली बाजारात तेलकट आणि कोरडय़ा त्वचेसाठी वेगवेगळे फेस वॉश मिळतातही… मात्र ते सगळ्यांनाच परवडणारे असतात असे नाही… याकरिता काही नैसर्गिक आणि घरगुती उपायांनाही तजेलदार आणि उजळ होऊ शकते.

  • मधामुळे तेलकट त्वचा आतून हायड्रेट होते. यामुळे त्वचेवरील छिद्रे स्वच्छ होऊन चेहऱयाला मॉईश्चर मिळते.
  • दही लावल्यामुळे टॅनिंगची समस्या दूर होते. दही हे एक नैसर्गिक मॉईश्चरायझर असून ते क्लिन्झरप्रमाणे काम करते.
  • पिकलेली पपई आणि आंब्याच्या पल्प एकत्र करून या मिश्रणाने चेहऱयाला मसाज करून चेहरा धुवावा. यामुळे त्वचेवरील छिद्रे मोकळी होतात.
  • बेसन पिठात पाणी किंवा गुलाबपाणी घालूनही चेहरा धुऊ शकता. हा उपाय तेलकट त्वचा आणि मुरुमांकरिता फायदेशीर आहे.
  • कोरफडीचा गर चेहऱयाला लावल्याने त्वचा मुलायम होते. शिवाय त्वचेला लवकर सुरकुत्या पडत नाहीत.
  • लिंबात नैसर्गिकरीत्या ब्लिंचिंगचे गुणधर्म आहेत. लिंबाच्या रसात मध किंवा दही मिसळून 15 मिनिटे चेहऱयाला लावावे नंतर चेहरा धुवावा. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.
  • पाण्यात एक ते दोन चमचे बेकिंग सोडा मिसळून या पाण्याने चेहरा धुवा. जास्त वापर करू नका कारण त्यामुळे त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते.
  • कापसाच्या बोळ्यावर खोबरेल तेल घेऊन मेकअप पुसून काढा. कोरडय़ा त्वचेसाठी हा उपाय क्लिझिंग ऑईलचे काम करतो.
  • सफरचंदाचे व्हिनेगर त्वचेतील पीएच फॅक्टर नियंत्रित ठेवायचे काम करतो. यामुळे जास्त कोरडीही होत नाही आणि जास्त तेलकटही होत नाही.