सुंदर चेहऱ्यासाठी

सुंदर दिसणं हा तरुणाईचा छंद. त्यामुळे घरच्या घरी उपलब्ध असलेल्या गोष्टीमधून सौंदर्य कसे खुलवतात ते जाणून घेऊया.

> बेसनमध्ये काकडीचा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्सचा त्रास होत नाही.

> टोमॅटोची पेस्ट बेसनामध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या येत नाहीत. तसेच त्वचेचा रंग उजळतो.

> बेसनामध्ये कच्चे दूध मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा तेलकटपणा निघून जातो.

> बेसनामध्ये दही मिक्स करून ती पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास रंग उजळतो आणि चेहऱ्यावरचे डाग नाहीसे होतात.

> हळद पावडर, लिंबाचा रस बेसनामध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास काळवंडलेला भाग निघून जातो.

> मध आणि हळद पावडर चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाहीत.