चमकदार चेहऱ्यासाठी टिप्स

1

सामना ऑनलाईन । मुंबई 

  • फळे, प्रथिनेयुक्त पदार्थ, भाज्या आणि मासे आहारात नियमित असले पाहिजेत. त्यामुळे त्वचा सतेज होते.
  • चेहऱ्याला नियमित बर्फाचा थंडावा दिलात तर तो तरतरीत दिसतो. चेहऱ्याचा तरुणपणा राखायचा तर बर्फ उपयोगी पडतो. चेहऱ्याला बर्फाच्या तुकड्याने घासून मसाज करणे हे त्वचाविकारतज्ञही सुचकतात.
  • बर्फाच्या मसाजमुळे रक्तप्रकाह काढतो. त्यामुळे शरीरातील हालचालींना वेग मिळाल्याने रक्तप्रकाह वेग घेतो. यामुळे अर्थातच त्वचा चमकदार होते.
  • हॉट आणि कोल्ड फेस पॅक नियमित वापराल तर चेहऱ्याला उजळ रंग येतो. त्वचेकडे रक्तप्रकाह वाढतो. त्वचेचा पोत सुधारणे. त्वचेला ओलावा मिळतो. ही सगळीच कामे या हॉट आणि कोल्ड फेसपॅकने साध्य होतात.
  • टर्किश टॉकेल गरम पाण्यात बुडकून त्यातील पाणी पिळून तो चेहऱ्यावर काही वेळ ठेवावा. नंतर तो बाजूला सारून दुसरा बर्फाच्या पाण्यात बुडकलेला टॉकेल चेहऱ्यावर काही काळ ठेवावा. हे आलटून पालटून करत राहावे. चेहरा टवटवीत होतो.
  • लाल द्राक्षातील अँटीऑक्सिडेंट्स त्कचेला नितळपणा देतो. त्यासाठी द्राक्षांचा गर मैद्यात भिजवून त्याची मऊ पेस्ट बनकून घ्यायची. ही पेस्ट चेहऱ्यावर पॅकप्रमाणे लावायची. हा पॅक वाळला की चेहरा धुऊन घ्यायचा.
  • चेहरा सतेज ठेवण्यासाठी घरच्या घरीही नियमितपणे चेहऱ्याचे मालिश करायला हवी. एखादे तेल किंवा बदामाचे तेल चेहऱ्याला लावायचे आणि हलक्या बोटांनी ते चोळायचे. हा मसाज रोज 5-7 मिनिटेच करा.
  • गाजराचा रस शरीरासाठी अनेक कारणांमुळे उपयुक्त ठरतो. गाजराच्या रसातील बीटा कॅरोटीन चेहऱ्यासाठी उत्तम टॉनिक ठरते. हे बीटा कॅरोटीन फोड बरे करण्यास अत्यंत फायद्याचा आहे.