स्वयंपाकघरातून

> बटाटय़ाचे पराठे बनवताना बटाटय़ाच्या मिश्रणात थोडी कसुरी मेथी घाला. यामुळे पराठे स्वादिष्ट होतात.

> लिंबू काही वेळ गरम पाण्यात भिजवून ठेवल्यास काही वेळाने तो कापल्यानंतर त्यातून जास्त रस निघतो.

> स्वयंपाकघरातील कोपऱ्यांमध्ये बोरीक पावडर घाला. यामुळे मुंग्या, झुरळासारख्या किटकांचा त्रास होणार नाही.

> मिरचीची देठे काढून ती फ्रिजमध्ये ठेवल्याने मिरच्या बराच काळ टिकतात. बरेच दिवस त्या वापरता येतात.

> तांदूळ शिजवताना त्यामध्ये एक चमचा तेल आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकल्याने भात मोकळा होतो.

> रात्री चणे भिजवायला विसरला असाल, तर सकाळी उकळलेल्या पाण्यात चणे भिजवा. यामुळे चणे लवकर भिजतील.

> वरण शिजवताना त्यामध्ये चिमूटभर हळद आणि बदामाच्या तेलाचे काही थेंब घातल्याने वरण लवकर शिजते. शिवाय चविष्टही लागते.

> स्वयंपाकघरात एखादा चिकट पदार्थ सांडल्यास त्यावर ब्लिचिंग पावडर टाका. नंतर तो ब्रशने स्वच्छ करा.