आरोग्यदायी टीप्स…

> लिंबाचा रस जास्त हवा असल्यास लिंबाला काही वेळ गरम पाण्यात ठेवावे. नंतर त्यातून रस काढावा.

> चेहऱ्यावर मध किंवा नारळाचे तेल लावा. त्याने शेव्हिंग क्रिमपेक्षा स्मूथ शेव होते. मध आणि नारळाच्या तेलात त्वचा कोमल बनवणारे घटक असतात. त्यातील ऍण्टीबॅक्टेरिअल घटक जळजळपासून वाचवते.

> रात्री झोपताना नाक बंद होण्याचा त्रास होत असल्यास तुमच्या उशीच्या शेजारी कांदा कापून ठेवा किंवा नाकाला कांद्याचा रस लावावा, लगेच नाक खुलेल. कांद्यामध्ये चोंदलेले नाक साफ करणारे घटक असतात.

> डोकं दुखत असल्यास थोडासा लिंबाचा रस डोक्याला लावायचा. दुखणे बरे होते. लिंबाचा वास उत्साहवर्धक आणि आरामदायी असतो. त्यामुळे शरीरात ऑसिड एल्कलाइन समतोल राखता येते.

> जीभ जळली असेल तर पिठीसाखर जिभेवर ठेवावी, त्याने जिभेची जळजळ थांबेल. साखरेत ग्लुकोज असते. त्याने आराम पडतो.

> जिथून मुंग्या येतात तिथे काकडीची साल ठेवावी. मुंग्यांना काकडीचा वास आवडत नाही. त्यामुळे काकडीच्या वासापासून त्या दूर राहतात.