स्वयंपाकघरातील गोष्टी

कांदा चिरताना डोळय़ातून पाणी येते अशावेळी मंद आचेवर कांदे हलकेसे गरम करून घ्या. नंतर गॅसजवळ कांदे चिरा किंवा काही वेळासाठी ते फ्रिजमध्ये ठेवून मग चिरा. डोळय़ातून पाणी कमी येईल.

> डाळीत चिमूटभर हळद आणि बदामाच्या तेलाचे काही थेंब टाकल्याने डाळ लवकर शिजते.

> हाताला चटका लागला तर बर्फ चोळा किंवा बटाटा किसून लावा. हेही शक्य नसल्यास तूप, खोबरेल तेल किंवा केळे कुस्करून लावा.

> महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांडय़ातून खडे मीठ बारीक करून घ्या. भांडय़ाच्या पात्यांना धार येते.

> पराठे बनवताना बटाटय़ाच्या मिश्रणात थोडीशी कसुरी मेथी घाला. यामुळे पराठे चवदार होतात.

> रात्री चणे भिजवायला विसरलात तर सकाळी उकळत्या पाण्यात चणे भिजत घाला.

> तांदूळ शिजताना काही चमचे तेल आणि लिंबाचा रस घातल्याने भात मोकळा होतो.

> मिरच्यांचे देठ काढून फ्रिजमध्ये ठेवल्याने मिरच्या बरेच दिवस टिकतात.

> कडक लिंबू काही वेळ गरम पाण्यात ठेवून कापल्यानंतर लिंबातून जास्त रस निघतो.

> स्वयंपाकघरातील कोपऱयांमध्ये बोरीक पावडर टाकल्याने झुरळांचा त्रास होणार नाही.

> साखरेच्या डब्यात ६-७ लवंगा ठेवल्याने साखरेला मुंग्या येत नाहीत.

> कणिक मळताना पाण्यासोबत थोडेसे दूधही घ्या. यामुळे पोळय़ा स्वादिष्ट होतील.

> फरशी चमकदार होण्यासाठी १ कप व्हिनेगरमध्ये गरम पाणी घालून फरशी पुसा.

> स्वयंपाकघरात एखादा चिकट पदार्थ सांडल्यास त्यावर ब्लिच पावडर टाका आणि ब्रशने साफ करा.