चांगल्या आरोग्यासाठी हे अवश्य खा!

सामना ऑनलाईन । मुंबई

  • शक्य असल्यास दररोज एक पेरू खावा. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरची पर्याप्त मात्रा असते. हे दोन्ही शुगर लेव्हल कमी करण्यास मदत करतात. तसेच पिकलेला पेरू हा गोड, थंड, पित्त, वात दोष आणि कफ दोष कमी करणारा आहे.
  • रोज रात्री पाण्यामध्ये आंब्याची पाने भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्यावे. आंब्याची पाने इन्सुलिन लेव्हल कंट्रोल करून मधुमेहापासून आराम मिळवून देतात. तसेच आंब्याची कोवळी पाने चावून त्याचा रस प्यावा आणि चोथा  टाकून द्यावा. त्याने आवाज सुधारतो, खोकला कमी होतो. हिरडय़ांचा पायोरियाही कमी होतो.
  • सकाळी एक ग्लास पाण्यात कडुनिंबाची सात-आठ पाने पाणी निम्मे होईपर्यंत उकळवून घ्या आणि नंतर गाळून हे पाणी प्या. कडुनिंबाचे पान शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढवून ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत करतात. कडुनिंबाच्या पानांचा रस प्यायल्याने रक्त शुद्ध होते.
  • रोज सकाळी रिकाम्या पोटी पाच-सहा तुळशीची पाने चावून खाल्ल्यास मधुमेहाला आराम मिळतो. तुळशीच्या पानांमध्ये अॅन्टीअॉक्सिडेण्टस् असतात जे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतात. तसेच त्वचाविकार, दमा, हृदयाचे विकार यासाठी तुळस खूप गुणकारी आहे.
  • रोज एक कप पाण्यात आवळ्याचा दोन चमचे रस टाकून हे पाणी प्यावे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे खाल्ल्याने पेनक्रियाज व्यवस्थित कार्य करतात. ज्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहते. तसेच नियमित आवळ्याच्या सेवनाने शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होतो.