टीप्स: तजेलदार… चमकदार…

त्वचा तजेलदार आणि आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी तरुण-तरुणी धडपडतात. पण घरच्या घरी असलेल्या काही पदार्थांचा मास्क बनवून तो चेहऱयाला लावला तर चेहरा चमकदार होतो.

पाव भाग हळद घेऊन त्यात एक चमचा खोबरेल तेल मिसळायचे. या फेस पॅकने चेहरा टवटवीत होतो.

एक छोटा चमचा दालचिनी घेऊन त्यात फक्त दोन चमचे मध घालायचे. या मिश्रणाने चेह-यावरील मुरुमे घालवता येतात.

एक चमचा दह्यात दोन चमचे ओट्सचे जाडसर पीठ एकत्र करून लावले तर चेहऱयावरील छिद्रे नाहिशी होतात.

चेह-यावरील सुरकुत्या घालवायच्या असतील तर एका अंडय़ामधील पांढऱया बलकात दोन चमचे ऍलोव्हेरा जेल मिसळून ते चेहऱयाला लावायचे.

त्वचा मुलायम आणि चमकदार व्हावी यासाठी दोन चमचे कॉफी पावडरमध्ये दोन चमचे मध मिसळून ते मिश्रण त्वचेवर लावा. फरक दिसेल.

चेहरा चमकदार होण्यासाठी दोन चमचे दह्यात दोन चमचे लिंबाचा रस घाला. परिणाम जाणवेल.

फक्त एक टोमॅटो आणि दोन चमचे दूध एकत्र करून तो फेस पॅक लावल्यास त्वचा चमकदार होईल.

डोळ्यांखालील काळे डाग घालवायचे तर एका अंडय़ाच्या पांढऱया बलकात दोन चमचे लिंबाचा रस मिसळून ते लावा. फायदा होईल.