नाभी! हे करून पहा…


नाभी हा शरीराचा अत्यंत महत्त्वाच भाग… वैद्य बरेचसे आजार नाभी पाहूनच ओळखतात. शरीरातील सर्व स्नायू नाभीशी जोडले गेलेले असल्याने नाभीवर उपचार केल्यास त्याचा संपूर्ण शरीरालाच फायदा होतो.

त्वचेला तेलाने मसाज करण्याचा जेवढा फायदा त्याही पेहीपेक्षा जास्त फायदा नाभी मध्ये तेल लावल्याने होतो. विशेषतः सर्दीच्या वेळी त्वचा रुक्ष, निर्जीव होते. अशा वेळी कितीही क्रिम किंवा तेलाचा वापर केला तरी त्वचेला त्याचा काहीच फायदा होत नाही. अशा वेळी नाभीला तेल लावावे. त्वचा मुलायम आणि सुंदर होते. बेंबी हा शरीराची केंद्रEिबदू आहे. बेंबीकडून तेल सर्व शरीरात पसरते. शरीराच्या फक्त वरच्या भागात तेल लावल्याने तेलाचा फायदा शरीराला होत नाही. म्हणून बेंबीला तेल लावावे यामुळे इतरही काही आजारांपासून सुटका व्हायला मदत होते.

> मासिक पाळीच्या काळात अंगदुखी, पोटदुखी असे त्रास महिलांना होत असतात. अशा वेळी कापसाच्या साहाय्याने नाभीत तेल लावल्याने महिलांना होणारा मासिक पाळीचा त्रास दूर होऊन काही वेळातच आराम मिळतो.

> काहींना पोटाचे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास असतात. नाभीला तेल लावल्याने पोटाचे अनेक विकार बरे होतात. अपचनाची समस्या असल्यासही नाभीत तेल लावावे.

> सर्दी झाल्यास ओठ फाटतात. अशा वेळी नाभीमध्ये मोहरीचे तेल घालावे. ओठ फाटण्याचा त्रास दूर होईल. या तेलात ओमेगा-३ आणि ओमेगा-६, फैटी एसिड, जीवनसत्त्व ई आणि अँटीऑक्सिडंटस् असते यामुळे त्वचेचे चांगले पोषण होते.

> दररोज झोपतेवेळी नाभीमध्ये मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाकल्याने थंडीच्या दिवसांत शरीर कोमल, मुलायम राहते.