स्वयंपाकघरातील कानगोष्टी

सामना ऑनलाईन । मुंबई 

– ऑसिडीटी झाली असेल तर सकाळी एक चमचा निवळी प्यायची. काही दिवसांत फरक दिसेल. चुन्याची टय़ूब आणून रात्री तांब्याभर पाण्यात पिळायची व ढकळून झाकून ठेकायची. सकाळी वरील थर काढून फक्त पाणी एका बाटलीत भरून ठेवायचे.’

-पुऱया खुसखुशीत होण्यासाठी कणिक मळतांना त्यात थोडी तांदळाची पिठी घालून मळावी.

– केळ्यांच्या घडाला देठाजवळ प्लास्टिकचा कागद गुंडाळून ठेवल्यास वेळी ४-५ दिवस जास्त टिकतात. केळी एखाद्या फडक्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवली तरीही छान राहतात.

– वाटणात मिरची घातली तर बाकीचे स्वाद लपतात. त्यापेक्षा आयत्यावेळी लाल तिखट घाला. छान चव येईल. तिखट आवडीप्रमाणे कमीजास्त घालता येते.

– फ्लॉवर शिजवताना त्यात दूध व किंचित मीठ घालून शिजवा. यामुळे फ्लॉवर पांढराशुभ्र व तजेलदार राहतो.

– मूठभर कुरमुरे घालून वाटल्यास इडल्या हलक्या होतात आणि एक चमचा लोणीही घालावे.

– पराठे करताना त्यात उकडलेला बटाटा किसून घाला. पराठे खुसखुशीत होतात.