कोलेस्टेरॉल कमी करा


दररोजच्या व्यग्र जीवनशैलीचा परिणाम खाण्यापिण्यावर होतो…यामुळे कॉलेस्टेरॉल वाढून श्वास आणि ह्रदयाशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागते… हे आजार होऊ नयेत यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केला तर कॉलेस्टेरॉल वाढणार नाही, हे पाहूया…  

  • बदाम, अक्रोड आणि पिस्त्यामध्ये ओमेगा-3 हे फॅटी ऍसिड असते. यामुळे वाईट कॉलेस्टेरॉल कमी होऊन चांगले कॉलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते.
  • लसणात एंजाइम्स असतात ज्यामुळे एलडीएल कॉलेस्टेरॉल कमी होतो. नियमित लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्यास कॉलेस्टेरॉलचे शरीरातील प्रमाण 9 ते 15 टक्क्यांनी कमी होऊ शकते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
  • आहारात सोयाबीन, डाळ आणि मोड आलेली कडधान्ये असतील तर रक्तात असलेले एलडीएल कॉलेस्टेरॉल बाहेर पडते. चांगल्या कॉलेस्टेरॉलची वाढ होते. एका निरोगी व्यक्तीला दररोज 18 ग्रॅम फायबरची आवश्यकता असते. यासाठी एक वाटी डाळ आणि एक वाटी रेषेदार भाज्यांचे सेवन करू शकता.
  • लिंबाप्रमाणे सगळ्या आंबट फळांमध्ये विरघळणारे फायबर असते. ते शरीरातील नको असलेले कॉलेस्टेरॉल रक्तप्रवाहात जाण्यापासून थांबवते. यासाठी सकाळच्या वेळी कोमट पाण्यासोबत रिकाम्यापोटी लिंबाच्या रसाचे सेवन करू शकाल.