टिप्स-मलई त्वचा

सामना ऑनलाईन

एक चमचा दुधाच्या साईत लिंबाचा थोडासा रस घालून दररोज चेहरा व ओठांना लावल्यास ते फाटत नाहीत.

तीन-चार बदाम आणि गुलाबाच्या १०-१२ पाकळ्या कुटून घेऊन त्यात एक चमचा दुधाची साय मिसळायची. हे मिश्रण चेहऱ्यावर लावले की सुरकुत्या आणि डाग नाहीसे होतात.

दुधाच्या सायीमध्ये थोडेसे मध आणि बेसन घालून ते चेहऱ्यावर लावल्यास उन्हामुळे काळवंडलेली त्वचा ठीक होते.

दुधाच्या साईत समुद्रफेसाची बारीक पावडर मिसळून चेहऱ्याला लावायची. यामुळे तारुण्यपीटिकांचा त्रास दूर होतो.

मुलतानी माती कुटून त्यात दुधाची साय घालून चेहऱ्यावर आणि कोपराला लावल्यास रंग उजळतो.

साबणाची ऍलर्जी असेल तर थोडी दुधाची साय घेऊन त्यात एक चमचा बेसनचे पीठ घालायचे. हे मिश्रण साबणाला उत्तम पर्याय ठरू शकेल. कारण यामुळे त्वचा मुलायम होते.

मोसंबी किंवा संत्र्याची साले कुटून त्यात दुधाची साय मिसळायची. हे मिश्रण लावल्यामुळे त्वचा मुलायम आणि स्वच्छ होते.

एक चमचा दुधाची साय घेऊन त्यात थोडे बेसनचे पीठ घालून त्याची जाडसर पेस्ट बनवायची. ती शरीरावर लावल्यास त्वचा कोमल आणि चमकदार होते. मात्र यानंतर त्वचेवर साबण लावू नये.