चला फिरायला

  • रतिंद्र नाईक

थंडीच्या चाहुलीने मुंबईकर सुखावलेत. चला तर मग… या मुहूर्तावर फिरायला.

हरातील धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच उमेद, ऊर्जा, धाडस आणि आनंद हवा असतो. हीच उमेद, ऊर्जा आणि धाडस ट्रेकिंगमधून मिळते. परंतु ट्रेक म्हणजे काय हे ट्रेकिंगला गेल्याशिवाय कळत नाही. म्हणूनच काही उत्साही मंडळी सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडत जंगलाच्या कुशीत शिरतात आणि दमवून टाकणाऱ्या डोंगरवाटा चढून स्वतःची हिंमत, धाडस, चिकाटी दाखवून देतात यालाच म्हणतात ट्रेकिंग.

सध्या थंडीची चाहूल लागली असून हिवाळ्यात ट्रेकिंगची मजा काही औरच असते. सर्वत्र गारवा आणि मनाला स्फूर्ती देणाऱ्या वातावरणाचा अनेक ट्रेकर्स आतुरतेने वाट पाहतात. कारण एरव्ही लवकर थकवणाऱ्या वातावरणात हिवाळय़ात मात्र ट्रेकर्सना एक वेगळाच स्टॅमिना मिळतो. या गारव्यामुळे थकवा उशिरा लागतो. त्यामुळे ट्रेकर्स झटपट निश्चित स्थळी पोहोचतात. मुंबईतही काही अशी ट्रेकिंग स्पॉट आहेत त्याची माहिती घेऊ.

येऊरचे जंगल
ठाण्यात वसलेले येऊरचे जंगल ट्रेकिंगसाठी उत्तम डेस्टिनेशन. ट्रेकर्सना येथे रंगीबेरंगी पक्ष्यांसह फुलपाखरेही पाहायला मिळतात. येऊरच्या मुख्य द्वारापासून जसजसे आत जाऊ तशी घनदाट झाडी वाढत जाते. ही धनदाट झाडी ओलांडताना मजा येते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
मुंबईच्या वेशीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वसले असून ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण म्हणून ओळखले जाते. कान्हेरी गुंफा तसेच इतर अनेक लहान-मोठ्या/ जंगलातील टेकड्या ट्रेकर्सना आकर्षित करत असतात. घनदाट जंगल, हिरवेगार निसर्ग आणि थंड वातावरणात नॅशनल पार्कमधील ट्रेकिंगची मजा काही औरच आहे. शहरातील ट्रेकर्सना आकर्षित करत असतात. घनदाट जंगल, हिरवेगार निसर्ग आणि थंड वातावरणात नॅशनल पार्कमधील ट्रेकिंगची मजा काही औरच आहे. शहरातील ट्रेकर्सना सहजच बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पोहोचता येईल.

माथेरान
ठाण्यापासून काही तासांच्या अंतरावर माथेरान असून थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रचलित आहे. हिवाळ्याचा ऋतू, त्यातच माथेरानमधील थंड वातावरण ट्रेकर्सना नेहमीच खुणावत असते. ट्रेकिंगदरम्यान येथील पक्षी, सरपटणारे प्राणी आणि रंगीबेरंगी फुले ट्रेकर्सना ट्रेकिंगदरम्यान पाहायला मिळतात. वातावरणातील गारव्यामुळे नेरळपासून माथेरानपर्यंत चढाई करण्यात ट्रेकर्सना कमी प्रमाणात थकवा जाणवतो. नेरळ स्थानकापासून माथेरानला जाण्यासाठी मिनी ट्रेन आणि गाड्यांचा पर्याय असला तरी मजा ट्रेकिंगमध्येच येते. हे अंतर पार करण्यासाठी ट्रेकर्सना तीन ते चार तास लागतील.

कर्नाळा
पनवेलपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर कर्नाळा अभयारण्य असून ते पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटक ट्रेकिंगचे थ्रिलही अनुभवू शकतात. कर्नाळय़ाच्या घनदाट अभयारण्यात ट्रेकर्सना बिबट्या व साळिंदरसारखे जंगली प्राणीही दिसू शकतात.पहाटेच्या थंडीत ट्रेकर्सनी येथील टेकिंग मस्तच.