ई-मेल करताना ही काळजी नक्की घ्या

सामना ऑनलाईन । मुंबई 

आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात कामाशी संबंधित असलेले बरेचसे व्यवहार आता आपण ई-मेलच्या माध्यमातून करत असतो. फस्ट इम्प्रेशन हे लास्ट इम्प्रेशन असं असल्याने एखाद्या व्यक्तीला महत्वाच्या कामाबाबत ई-मेल पाठवायचा असल्यास तो लिहिताना अनेक गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ई-मेल करताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे हे सांगणार आहोत.

– महत्वाच्या कामाचा ई-मेल करताना कामाचा मुळ मुद्दा किंवा विषय नीट लक्षात ठेवून मुद्देसूद मेल करा.
– ई-मेल करताना आपण काय लिहितोय याकडे नीट लक्ष असू द्या. बऱ्याचदा स्पेलिंगच्या चुका होतात. त्यामुळेच अशा चुका प्रकर्षाने टाळा.
– कधी कधी ई-मेल करताना व्याकरणातही चुका होतात. त्यामुळे स्पेलिंगच्या जोडीने व्याकरणाचेही भान ठेवा.
– ई-मेलमध्ये कामासंबंधित अतिशय महत्वाच्या गोष्टी असल्यास त्या ठळक करा.
– कोणताही ई-मेल पाठवण्यापूर्वी तो आधी नीट, व्यवस्थित वाचून घ्या.
– काम आणि त्यासंबंधित गोष्टींचाच मेलमध्ये उल्लेख करा. उगचच वायफळ गोष्टी ई- मेलमध्ये मांडू नका.
– ई-मेल करताना तो पाठवण्याच्या आधी खाली regard सारख्या शब्दांचा उल्लेख करा.
– एखादा ई-मेल पाठवताना तो एकाचवेळी अनेकांना पाठवताना त्यातही महत्वाच्या व्यक्तीला आधी आणि CC मध्ये इतर व्यक्तींचा उल्लेख करा.
– एखाद्या व्यक्तीने काही कामानिमित्त महत्वाचा ई-मेल केला असेल तर त्याला वेळेत रिप्लाय करायला विसरू नका.