टीप्स : घरात पाण्याचे नियोजन

> घरातील ७५ टक्के पाणी न्हाणीघरातच वाया जाते. याकरिता नळाच्या लिकेजमुळे महिन्याला २५० लिटर पाणी वापराविना गळून जाते. मिनिटाला ४५ थेंब पाणी नळातून ठिबकत असते. म्हणजे तीन तासांत साधारण १ लिटर पाणी वाया जाते. यासाठी नळाचे लिकेज थांबवण्याचा प्रयत्न करा.

> ब्रश करताना वॉश बेसिनचा नळ सुरू असेल तर एकावेळी ४ ते५ लिटर पाणी अनावश्यक वाहून जाते. म्हणजे महिन्याला १५० लिटर. चार जणांचे कुटुंब असेल तर ६०० ते ७०० लिटर पाणी वापराविना नष्ट होते.

> घरात आरओ मशीन असेल तर त्याचे पाणी काढताना दररोज ३ ते ४ लिटर पाणी वाया जाते. म्हणजे वर्षाला १४ लिटर पाणी अनावश्यक नष्ट होते. यासाठी हे पाणी झाडं, गाडी, बाथरुम धुण्यासाठी वापरू शकता.

> टॉयलेट टँक बऱ्याचदा लिक होण्याची समस्या असते. हे थांबवले तर दर महिन्याला ५ हजार लिटर पाणी वाचवणे शक्य होईल. यासाठी फ्लश करण्याऐवजी बादलीने पाणी ओतावे. यामुळे रोज कमीतकमी १२५  लिटर पाणी वाचू शकते.

> कपडय़ांचे २ किंवा १० कितीही जोड धुतले तरी सारखेच पाणी लागते. यासाठी वॉशिंग मशीन तेव्हाच वापरा जेव्हा जास्त कपडे धुवायचे असतील. यामुळे दर महिन्याला कमीतकमी साडेचार हजार लिटर पाण्याचा अपव्यय टळेल.

> अंघोळ करताना शॉवरऐवजी बादलीचा वापर करा. यामुळे ८० टक्के पाणी वाचेल.

> भांडी धुताना रोज २० टक्के पाणी वाचवू शकता. यासाठी नळाखाली भांडी धुण्याऐवजी बादली किंवा टबचा वापर करा.  ही सवय लावल्यास २० ते २५ लिटर पाण्याची बचत होईल.

> शेव्हिंग करताना नळ बंद करा. नळाऐवजी मगाचा वापर करा. यामुळे महिन्याला साधारण २०० लिटर पाणी सुरक्षित राहील. जेणेकरून या पाण्याचा वापर इतर कामांसाठी होऊ शकेल.

> कार धुण्यासाठी पाइपाचा वापर केला तर एकावेळी १५० लिटर पाणी अनावश्यक खर्च होते. याऐवजी बादलीत पाणी घेऊन गाडी धुतल्यास २०लिटरच पाणी वापरले जाते. यामुळे दरवेळी १३० लिटर पाणी शिल्लक राहील.