साडी प्युअर सिल्कची आहे का…कसे ओळखाल?

सामना ऑनलाईन। मुंबई

साडी हा महिलांचा आवडता पेहराव. यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या कपाटात असाव्यात अशी सगळ्याच महिलांची ईच्छा असते. त्यातही सिल्कची एक तरी साडी प्रत्येकीकडे असतेच असते. चमकदार सुळसुळीत सिल्कची साडी वजनाने हलकी आणि दिसायला देखणी असल्याने तीचा वेगळाच असा एक लूक असतो. पण बऱ्याचवेळा प्युअर सिल्क सांगून दुकानदार हलक्या प्रतीच्या सिल्कची साडी आपल्या गळ्यात मारतो आणि आपल्याला कळतंच नाही. म्हणूनच प्युअर सिल्क कसे ओळखायचे यासाठी काही टीप्स.

१..प्युअर सिल्क चमकदार असतं. यामुळे जर तुम्ही कांचीवरम साडी घेत असाल तर ती साडी प्युअर सिल्क कांचीवरम आहे हे ओळखण्यासाठी साडीची जर नखाने हल्की खरडून पाहावी. जरीच्या खाली लाल रंगाचं सिल्क दिसलं कि समजायचं कि ही साडी १०० टक्के प्युअर सिल्क कांजीवरम आहे.

२..बनारसी साडीचा पदर म्हणजे सहा ते आठ इंच लांब सिल्कचा कपडाच असतो. प्युअर बनारसी साडीवर नेहमी पारंपारिक नक्षीकाम केललं असतं. यात मोगलाई नक्षीकामावर आधारित अमरु, अंबी आणि दोमक बनारसी साडीच्या पदरावर असतात.

३..प्युअर सिल्कची साडी वजनाने हलकी. सुळसुळीत असते. अंगठीमधूनही ती सहज आरपार जाते. यामुळे सिल्कची साडी घ्यायला दुकानात जाल तेव्हा ही चाचणी नक्की करुन बघा.

४..सिल्कमधील वेगवेळ्या रंगाचे रेशमाचे धागे साडीला वेगळाच लूक देतात. यामुळे उजेडात प्युअर सिल्क साडीचा रंग बदलतो. कधी त्यात सप्तरंगी छटाही झळाळतात.