परदेशात जाताय?

l परदेशी जाताना जर दोघे एकत्र जात असाल तर दोघांचे सामान दोन बॅगांमध्ये अर्धे अर्धे करून भरा. कारण त्यामुळे माझे सामान माझी बॅग हा कुणाचाच अट्टहास राहात नाही.

l आपल्या सगळ्या बॅगांचे मोबाईलवर फोटो काढून ठेवा. बॅगला रंगीबेरंगी पट्टे बांधा. पट्टा मिळाला नाही तर साडीचा फॉलही लावता येईल. यामुळे आपली बॅग अनेक बॅगांमध्येही ओळखता येते.

l बॅगांना कुलूप लावण्यापेक्षा नट आणि स्क्रू लावणे चांगले. म्हणजे बॅग तपासायची वेळ येते तेव्हा ते व्यवस्थित काढून नंतर परत बसविता येतात. शिवाय हमाल लोक बॅगेत त्यात हात घालून सामान ढापू शकत नाहीत.

l बॅगवर मास्किंग टेप चिकटवून त्यावर मार्कर पेनने नाव आणि ठिकाण इंग्लिशमध्ये लिहून ठेवा.

l एकटेच जाणार असाल तर बॅग ही ट्रॉलीवाली सुटकेस न घेता मोठी बॅक पॅक घ्या आणि दोन्ही हात मोठ्या चेकइन ट्रॉली बॅग्स खेचण्यासाठी मोकळे ठेवा.