नोटिफिकेशन्स थांबवण्यासाठी फेसबुक आणणार ‘स्नुझ’ फिचर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपल्या युजर्ससाठी फेसबुककडून नेहमीच नवनवीन फिचर्स दिले जातात. काही दिवसांपूर्वीच फेसबुकने गेम खेळण्याऱ्यांसाठी लाइव्ह चॅटसोबतच व्हिडिओ चॅटचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर आता फेसबुक ‘स्नुझ’ (Snooze) नावाचं नवं फिचर आणणार आहे. या फिचरमुळे नको असलेल्या पेजवरील तसेच मित्रांकडून येणाऱ्या नोटिफिकेशन्स बंद करता येणार आहेत.

‘स्नुझ’ हे नवं फिचर येत्या काही दिवसात येणार आहे. या फिचरमुळे एखाद्या मित्राला, ग्रुपला किंवा मग पेजला अनफॉलो न करता काही दिवसांसाठी म्यूट करू शकता. तसेच ‘स्नुझ’ या फिचरमुळे ३० दिवसांसाठी नको असलेली नोटिफिकेशन दूर ठेवू शकतो. फेसबुक यासारखे आणखी काही फिचर्स आणण्याच्या तयारीत आहे. लवकरच येत्या काही दिवसात ‘स्नुझ’ या फीचरचा वापर करता येईल.

अशा प्रकारे वापरा ‘स्नुझ’ फिचर

एखाद्या पोस्टला म्यूट करायचे असेल तर पोस्टच्या उजव्या बाजूला ड्रॉप डाऊन ऑप्शनमध्ये ‘स्नूझ’ हा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.

‘स्नूझ’ या फिचरमुळे एखादी व्यक्ती, पेज, ग्रुप यांच्याशी संबंधित असलेले नोटिफिकेशन्स ३० दिवस दिसणार नाहीत.