मुंबईकरांनो रेल्वेसाठी आज रविवार!

फाईल फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

बातमीचा मथळा वाचून तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल मात्र हे खरं आहे. आज गुड फ्रायडे असल्याने राष्ट्रीय सुटी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही हक्काची सुटी असते. त्यामुळे आजच्या दिवशी रेल्वे कर्मचारी देखील कमी असतात. याच कारणास्तव उपनगरीय लोकल सेवा ही रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे धावते.

खासगी क्षेत्रात काम करणारे मुंबईकर आज रेल्वे स्थानकांवर पोहोचल्यानंतर काही गाड्या रद्द झाल्याचे कळल्याने त्यांचा फज्जा उडला. आजच्या दिवशी रेल्वे वाहतूक रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहील, अशी उद्घोषणा स्थानकांवर होत होती. मात्र असे असले तरी गाड्या रद्द असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.