ध्वनिप्रदूषणाकडे दुर्लक्ष कराल तर 2050 पर्यंत ठार बहिरे व्हाल….!

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

जर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या गोंगाटाकडे , आवाजाकडे, गोंधळाकडे दुर्लक्ष करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण तुमचं हेच दुर्लक्ष तुम्हांला भविष्यात ठार बहिरे करू शकतं. असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या संशोधनात केला आहे.

WHO ने नुकतचं एक संशोधन केलं. त्यात जगभरात सध्या 44.6 कोटी नागरिकांना ऐकण्याची समस्या असल्याचे समोर आले. हे सर्वजण रोज गोंगाटात वावरत. काहीजणांना ट्रॅफिकमुळे होणाऱ्या आवाजाचा त्रास व्हायचा. तर काहीजणांना आजूबाजूला रोज होणाऱ्या कामाच्या गोंधळाचा. पण रोज मरे त्याला कोण रडे या म्हणीप्रमाणे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी यातील बऱ्याचजणांना आता कमी ऐकू येण्यासाऱख्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. पण जर ते याच वातावरणात राहतील तर 2050 पर्यंत त्यांचा आकडा 90 कोटींच्या घरात जाईल असा गंभीर इशारा WHO ने या संशोधनातील अहवालात केला आहे.

तसेच या अहवालात सध्यपरिस्थितीत 60 % लोकं ऐकण्याशी संबंधित समस्या घेऊन डॉक्टरांकडे जात आहेत. यातही 12 ते 35 वर्ष वयोगटातील मुलं व व्यक्तींची संख्या अधिक आहे. असे म्हटले आहे.