न्यायमूर्तींचा वाद उद्यापर्यंत मिटेल: अॅटॉर्नी जनरल वेणुगोपाल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

खरं पाहाता आजची पत्रकार परिषद टाळता आली असती. मात्र उद्यापर्यंत न्यायमूर्तींनी मांडलेल्या सर्व समस्यांचे निराकरण झाल्याचे पाहायला मिळेल, असं मत अॅटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे मुत्सदी, प्रचंड अनुभवी आणि ज्ञानी आहेत. सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली असून उद्यापर्यंत समस्या सुटलेली असेल अशी मला खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासन योग्यरित्या काम करत नसल्याची तक्रार सरन्यायाधीशांकडे केल्यानंतर न्यायमूर्ती चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर, कुरियन जोसेफ स्वतंत्र यांनी पत्रकार परिषद घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अशा प्रकारे पत्रकार परिषद घेण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. घडलेल्या प्रकाराची देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली.