कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना चार दिवस टोल माफी


सामना ऑनलाईन । मुंबई

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्य सरकारकडून खुशखबर देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना 10 ते 13 सप्टेंबर दरम्यान टोल माफी देण्यात आली आहे. कोल्हापूर मार्गे कोकणात देखील गणेश भक्तांना टोल फ्री प्रवास करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय जाहिर केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात