१ डिसेंबरपासून गाडय़ांवर डिजिटल स्टिकर,टोलनाके होणार कॅशलेस

फाईल फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

देशभरातील टोलनाके कॅशलेस करण्याच्या दिशेने सरकार पावले उचलत आहे. त्यादृष्टीने १ डिसेंबरपासून बाजारात येणाऱया प्रत्येक वाहनावर डिजिटल स्टिकर असणार आहे. टोलनाक्यांवरील कॅमेऱयांमधून या डिजिटल स्टिकरचे स्कॅनिंग होऊन गाडी किती किलोमीटर अंतरावरून आली आहे हे कळून त्यानुसार वाहनचालकाच्या रिचार्ज अकाऊंटमधून पैसे आपोआपच कापले जाणार आहेत. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

देशभरातील ३७८ टोल प्लाझांवर सुविधा उपलब्ध

देशात एकूण ३७८ टोल प्लाझा आहेत या सर्व ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. जीएसटीच्या अंमलबजाकणीमुळे आतापर्यंतचे २२ सेस क १७ टॅक्सेस रद्द झाले आहेत. यामुळे किकिध कर भरण्यासाठी जकात नाके आदी ठिकाणी ज्या ट्रक, कंटेनरच्या रांगा लागायच्या त्या बंद झाल्या आहेत. पर्यायाने इंधनाची बचत तर झालीच, पण प्रदूषणातही घट झाली आहे. पूर्वी एक ट्रक सरासरी २२५ कि.मी. अंतर कापायचा तो आता ३०० ते ३५० कि.मी. अंतर कापत आहे. ट्रकमालकाला प्रत्येक ट्रकमागे दरकर्षी सरासरी दीड लाख रुपयांचा फायदा होत आहे, असेही गडकरी म्हणाले.