Video : मुंबई-नाशिक महामार्गावर टोल कर्मचारी व वाहनचालकांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी


सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई-नाशिक महामार्गावरील अर्जुनली पडघा येथील टोलनाक्यावर टोल कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. टोलनाक्यावर 2 वाहन चालकांमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या टोलनाका कर्मचाऱ्यास वाहनचालकांनी मारहाण केली. त्यामुळे संतप्त टोलनाका कर्मचाऱ्यांनी या वाहनचालकांना बेदम मारहाण केली आहे.