आपली जीभ काय सांगते?

ब-याचदा डॉक्टर जीभ तपासून औषध देतात… जिभेचा रंग हा शरीराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. जीभ पाहून कसं होत असेल आजाराचं निदान?

गुलाबी रंग – जिभेवर कोणत्याही प्रकारचे डाग नसून ती जर गुलाबी रंगाची असेल तर तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात असे समजावे. जिभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर पचनक्रिया सुरळीत नसून व्हायरल इन्फेक्शन असू शकते. काही वेळा अशक्तपणाही येतो.

पिवळा रंग – सर्दी, वायरल इन्फेक्शन किंवा शरीरात ऊर्जा वाढली आहे, हे जिभेवरील पिवळा रंग सांगतो. पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.

लाल रंग ; लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम तसेच जिभेचा सर्वात पुढचा भाग लाल होणं हे मानसिक समस्येचे लक्षण आहे.

पांढरा रंग – जिभेवर अनेकदा पांढरे डाग पडतात. हे संसर्ग किंवा जास्त घाम येण्याचे संकेत असतात.

निळा रंग – शरीरात जीवनसत्त्व बी-टू ची कमतरता आणि महिलांना दुखणे याचे संकेत देते. कोणत्याही औषधाच्या दुष्परिणामामुळेदेखील जीभ निळी पडते.

कोरडी जीभ – जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे कावीळ. अशक्तपणा, कमी झोप, आतडय़ांना सूज, थकवा याचे चिन्ह आहे.