कासवाची अंगठी

> कासवाची अंगठी वास्तुशास्त्र्ाात शुभ मानली जाते. व्यक्तीच्या जीवनातील अनेक दोष दूर करण्याचे काम या अंगठीमुळे होते. यामुळे आत्मविश्वास वाढतो.

> कासव पाण्यात राहतं म्हणून ते सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीचं लक्षण मानलं जातं. पौराणिक कथेनुसार कासव समुद्र मंथनातून उत्पन्न झाले आहे तसेच लक्ष्मीसुद्धा तिथूनच निर्माण झाल्याने कासव समुद्धीचं प्रतीक मानलं जातं.

> शास्त्र्ाानुसार कासावाला लक्ष्मीदेवीप्रमाणे धनप्राप्ती, धैय आणि शांतीचे प्रतीक मानले जाते.

> वास्तुशास्त्र्ाानुसार कासवाची अंगठी चांदीत बनवावी. दुसऱया धातूची अंगठी बनवणार असाल तर कासवाचा आकार चांदीचा बनवून त्यावर सोन्याचा मुलामा किंवा दुसरे कोणतेही रत्न लावू शकतात.

> बोटात अंगठी घालताना कासवाचं डोकं व्यक्तीच्या दिशेने असावा.

> ही अंगठी तर्जनी किंवा मध्यमा बोटामध्ये घालावी.

> धनाची देवता लक्ष्मीचा वार शुक्रवार असल्यामुळे कासवाची अंगठी शुक्रवारी बोटात धारण केली जाते.