रास बघा! मग ठरवा कुठं कुठं जायचा फिरायला

सामना ऑनलाईन। मुंबई

आपल्या देशात कुठल्याही कामाचा शुभारंभ करण्याआधी त्यांचा राशीवर होणारा परिणाम बघितला जातो. त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेतला जातो. पण परदेशात मात्र कामाच्या आधी नाही तर चक्क फिरायला जाण्याआधी राशी बघणं हे नवीन फॅड आलं आहे. यात राशीला सुट होणाऱ्या पर्यटनस्थळांची निवड केली जाते. जाणून घेऊया या नवीन फॅडबद्दल.

france-sign-destination

कर्क,वृश्चिक,मीन ही रास असणाऱ्यांना एकट्याने फिरायला जाण्यात विशेष रस नसतो. कुटुंब ,मित्रमंडळीच्या गोतावळ्याबरोबर सुट्टया घालवण्यासाठी या व्यक्ती नेहमीत तत्पर असतात. पॅरिस, फ्रान्सचं सौंर्दय यांना सतत खुणावत असतं. थंड हवेची ठिकाणं या राशीच्या व्यक्तींसाठी फिरण्याच उत्तम ठिकाण ठरू शकतं.

south-africa

मेष, सिंह,धनु म्हणजे प्रचंड उर्जावान राशी. हसत खेळत राहणं, स्पष्ट बोलणं आणि आशावादी असणं ही यांची वैशिष्टय. यामुळे या व्यक्तींसाठी साहसी सहल उपयुक्त ठरते. समुद्र किनारा, आलिशान हॉटेल्समधलं वास्तव्य यांना आवडतं. यामुळे या राशीसाठी दक्षिण आफ्रिका बेस्ट स्पॉट आहे.

usa-sign

जर तुमची रास वृषभ, कन्या आणि मकर असेल तर अमेरिका तुम्हाला नक्कीच आवडेल. कॅलिफोर्नियातील नापाचे खोरं तुमच्यासाठी वेगळाच अनुभव देणारं ठिकाण असेल.

canada-sign

मिथुन, तूळ, आणि कुंभ रास असलेल्यांना निसर्ग नेहमीच खुणावत असतो. यामुळे डोंगराळ भाग, दऱ्या खोऱ्यात फिरायला या व्यक्ती नेहमीच उत्सुक असतात. कॅनडात फिरणं या राशीच्या लोकांना स्वर्गीय सुख नक्कीच देईल.