Photo – देशातील ‘ही’ सौंदर्यस्थळे भुरळ पाडतात, पण इथे पोहोचणं आहे अशक्य

तुम्हाला माहित आहे का? आपल्या देशात अशी काही ठिकाणे आहेत जी बघताच क्षणी भुरळ पाडतील. मात्र त्या ठिकाणांवर पोहोचणे अशक्य आहे. देशातल्या काही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने तसेच त्या क्षेत्राच्या वादांमुळे तिथे जाण्याची परवानगी नाही. या ठिकाणांचे फोटो पाहिल्यावर या ठिकाणी जाण्याचा मोह आवरणार नाही इतकी सुंदर ठिकाणे आपल्या देशात आहेत.

उत्तर सेंटीनेल बेट, अंदमानnorth_sentinel_island-canva

उत्तर सेंटीनेल हे अंदमानातील एक बेट आहे. हे ठिकाण अंदमानच्या समुद्रात टेक्टोनिक प्लेट्सच्या अगदी मध्यभागी आहे. हे दूरून पाहता येऊ शकते, मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव या बेटावर जाण्यास मनाई आहे.

पॅन्गॉंग त्सो सरोवर , लडाख

pangong-lake-ladakh1-canva

पॅन्गॉंग त्सो हे देशातील सगळ्यात प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. याचा मोठा भाग सरोवराने वेढलेला आहे जो प्रवाशांसाठी दुर्गम आहे. या सरोवराचा अर्धा भाग वादग्रस्त भागात येतो. येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) असून हिंदुस्थानला चीनच्या नियंत्रित भागापासून वेगळे करते. त्यामुळे येथे फक्त देशाच्या अखत्यारित येणाऱ्या भागाला पर्यटक भेट देऊ शकतात.

बॅरेन बेट, अंदमान

barren_island-canva

अंदमान निकोबारच्या बॅरन नावाच्या बेटावर एक ज्वालामुखी आहे. जो अंदमानच्या समुद्रात अॅक्टिव्ह टेक्नोटिक प्लेट्सच्या बरोबर मध्यभागी आहे,. शिप किंवा क्रुझेसवरुन जाताना हा नजारा पाहू शकता. मात्र या बेटावर उतरण्याची परवानगी कोणालाच नाही.

लक्षद्वीपची काही बेट

laksdweep-canva

लक्षद्वीपमध्ये जवळपास 36 बेटं आहेत. येथे फक्त एकाच बेटावर पर्यटकांना फिरण्याची परवानगी आहे. स्थानिक लोकांचे हित लक्षात घेऊन येथील अनेक बेटे प्रवाशांच्या आवाक्याबाहेर आहेत. हे ठिकाण मुख्य नौदलाचा भाग देखील आहे, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाही येथे जाण्याची परवानगी नाही. येथे अगती, बंगाराम, कदमत, कवरत्ती आणि मिनीकोय आयलँड सारख्या ठिकाणी भेट देण्याची परवानगी घेता येते.

भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर , मुंबई

bhabha-canva

बार्क म्हणजे बाभा एटोमिक रिसर्च सेंटर हे मुंबईच्या उपनगरात आहे. इथे कोणालाही आत जायला परवानगी नाही .
हे देशाचे प्रमुख आण्विक संशोधन केंद्र असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव येथे भेट देता येत नाही. सरकारी संस्थांच्या परवानगीनंतर केवळ संशोधक किंवा विद्यार्थी येथे जाऊ शकतात.