सलग बर्फवृष्टीमुळे कश्मीरमध्ये पर्यटक अडकले

सामना ऑनलाईन । श्रीनगर,सिमला

सतत होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे जम्मू कश्मीरचा हिंदुस्थानशी संपर्क तुटलाय. गेल्या तीन दिवसांपासून ३०० किलोमीटर लांबीचा श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. या महामार्गावर बर्फवृष्टी आणि दरड कोसळणं सुरूच आहे. यामुळे अनेक प्रवासी, मालाची ने-आण करणाऱ्या गाड्या हजारो गाड्या महामार्गावरच अडकून पडल्या आहेत.

trafficवाहतूक पोलीस, आणि स्थानिक प्रशासनाने दरडप्रवण क्षेत्रातून गाड्या आणि प्रवासी सुरक्षित स्थळी हलवले आहेत. मात्र विविध ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना होत असल्याने पोलीस आणि प्रशासनाचीही त्रेधातिरपीट उडालीय. ६ तारखेपासून महामार्गावरची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. काझीगुंड,बनिहाल,पटनीटॉप इथे रस्त्यावर जवळपास २ ते पाच फूट बर्फ साचलाय.

traffic-3या बर्फवृष्टीमुळे जम्मूकडे येणारे जवळपास ३५० पर्यटक काझीगुंड इथे अडकले आहे. जवाहन बोगद्याच्या दोन्ही बाजूला नेमक्या किती गाड्या अडक्या आहेत, हे निश्चितपणे सांगता येत नाहीये. त्यामुळे अडकलेल्या पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने प्रवाशांना सुखरूप स्थळी नेण्याला प्राधान्य दिलं आहे. महामार्गावरची वाहतूक कोंडी जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत जम्मू आणि श्रीनगर इथून गाड्या बाहेर सोडल्या जाणार नाहीत असं स्पष्ट करण्यात आलंय.