बाप्पा काय ह्या ट्रॅफिक! कोकणातून मुंबईला येण्यासाठी प्रचंड रांगा

mumbai-goa-highway-traffic
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । रायगड

गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर पुन्हा मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांना वाहतुकीच्या कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे गाड्यांच्या वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरी माणगाव येथे वाहनांची गर्दी झाली असून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर 4 किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या आहेत. वाहतुकीची ही कोंडी फोडण्यासाठी ढालघर फाटा येथून वाहतूक निजामपूर पालीमार्गे वळवण्यात आली आहे.