
सामना ऑनलाईन । नवी मुंबई
पनवेल मुंब्रा मार्गावर वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी उभ्या असलेल्या एका वाहतूक पोलिसाचा वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. अतुल घागरे असे त्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात व वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल मुंब्रा मार्गावर होणारी वाहतूक कोंडी ही पोलिसांसाठी देखील डोकेदुखी बनली आहे. घागरे हे वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी तळोजा येथील निळतज फाट्यावर उभे होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या एका गाडीने त्यांना धडक दिली. या धडकेत घागरे गाडीखाली चिरडले गेले. पोलीस सध्या घागरे यांच्या अपघाताला जबाबदार असलेल्या वाहनचालकाचा शोध घेत आहेत.